मुख्यमंत्र्यांची लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा ; म्हणाले १५०० ऐवजी देऊ…

पुणे : येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभा दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, रक्षा बंधनाच्या आधी हे पैसे पोहोचले पाहिजे असे मी कॅबिनेटमध्ये सांगितले. ट्रायल रनसाठी खात्यात एक रुपया टाकायचा सल्ला काहींनी दिला. पण अजितदादा, फडणवीस यांनी सांगितलं तीन हजार टाका आणि ट्रायल रन घ्या. लाडक्या बहिणी सांगत असतात खात्यात पैसे आले. तेव्हापासून राखी बांधायचा कार्यक्रम सुरू झाला.

बहिणींच्या आयुष्यातील हा आनंदाचा दिवस आहे. हा आनंद साजरा करण्यासाठी नारी शक्ती आल्या आहेत. मी बहिणींशी संवाद साधून स्वातंत्र्य दिन साजरा केला. अनेक बहिणींनी भावना व्यक्त केल्या. आम्हाला आधार मिळाला म्हणाल्या. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व्यक्त केला.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहील. उद्या सरकारची ताकद वाढली तुम्ही बळ दिलं तर दीड हजाराचे पावणे दोन हजार होतील. दोन हजार होतील, अडीच हजार होतील, अडीच हजाराचे तीन हजार होतील.

या सरकारची ताकद वाढली तर तीन हजारापेक्षा जास्त देण्याची ताकद आली तर आम्ही हात आखडता घेणार नाही. सरकार तुमचं आहे. देण्याची नियत लागते. दानत लागते. ती आमच्या सरकारकडे आहे”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.