तरुण भारत लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२२ । बालविवाह केल्याप्रकणी अनेकांवर कारवाई करण्यात आल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. अशीच एक घटना चाळीसगाव तालुक्यात समोर आली असून तब्बल ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील लोंजे, सध्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे वास्तव्याला असलेल्या तरुणाशी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह झाला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांनी चौकशी केली. याप्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिसात पती गोकुळ कैलास पवार, अरुण फुलसिंग पवार, चुलत दीर सज्जन रतन पवार, सासरे कैलास फुलसिंग पवार, चुलत दीर ज्ञानेश्वर बाबुलाल पवार, दीर धनराज कैलास पवार, चुलत दीर रवींद्र युवराज पवार (सर्व रा.लोंजे ता. चाळीसगाव) भाऊसाहेब रामलाल सोनवणे, आई विमलबाई भाऊसाहेब सोनवणे, अण्णा अभिमन मालिक, आजी कलाबाई अण्णा मलिक (सर्व रा. झोडगे, ता.मालेगाव जि.नाशिक) यांच्याविरोधात बालविवाह कायद्याप्रमाणे चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र साळुंखे करीत आहे.