---Advertisement---

Child Marriage : धुळे जिल्ह्यातील पिंजारझाडी, जुनवणेतील बालविवाह रोखले, चाइल्ड हेल्पलाइन पथकाकडून कुटुंबीयांचे समुपदेशन

---Advertisement---

Child Marriage : राज्यात बालविवाह प्रतिबंधक कायदा असूनही बऱ्याच ठिकाणी राजरोसपणे अल्पवयीन मुर्तीचे विवाह लावून दिले जात आहेत. यात धुळे जिल्ह्यात एकाच आठवड्यात दोन बालविवाह होण्यापूर्वीच चाइल्ड हेल्पलाइनच्या पथकाकडून समुपदेशनाद्वारे रोखण्यात आले. साक्री तालुक्यात पिंजारझाडी येथे १६ वर्षीय मुलीच्या हळदीची तयारी २२ मे रोजी सुरू होती, तर दुसरी जुनवणे येथील १६ वर्षीय मुलीचा विवाहापूर्वी हळदीसाठी चिंचगव्हाण येथे जाण्यापूवीच परत बोलावण्यात येऊन बालविवाह रोखण्यात आला.

साक्री तालुक्यात पिंजारझाडी येथे १६ वर्षीय मुलीचा विवाह २० वर्षीय युवकाशी २३ मे रोजी होता. याची माहिती २२ मे रोजी रात्री ११.३२ वाजता चाइल्ड हेल्पलाइन १०९८ वर धुळे येथे मिळाली. यासंदर्भात चाइल्ड हेल्पलाइन पथकाचे संदीप पवार, पिंजारझाडीचे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी तथा ग्रामसेवक, पोलीसपाटील, सरपंच, अंगणवाडी सेविका तसेच साक्री पोलीस ठाण्याशी डायल ११२ क्रमांकावर संपर्क साधून तातडीची मदत म्हणून तत्काळ बालविवाह थांबविण्याविषयी माहिती देण्यात आली.

यात विवाह होत असलेल्या ठिकाणी मंडप उतरविण्यात येऊन बालविवाह रोखण्यात आला. यात बालकल्याण समितीच्या अध्यक्षा डॉ. उषा साळुंखे, सदस्या प्रा. सुरेखा पाटील, अॅड. अनिता भांबेरे यांनी कुटुंबीयांचे समुपदेशन केले. तसेच मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण व मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांचा विवाह करणार नाही, असे मुलाच्या व मुलीच्या पालकांकडून हमीपत्र लिहून घेण्यात आले.

ग्रामसेवक भगवान पावरा, पोलीसपाटील सुरेश जगताप, सरपंच रामचंद्र साबळे, एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्पाचे पर्यवेक्षक एस. एम. मोरे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. जयप्रकाश जगताप, साक्रीचे पोलीस शिपाई मंगेश खैरनार, डी. एन. म विची, चाइल्ड हेल्पलाइन १०९८ चे पवार यांनी काम पाहिले.

धुळे तालुक्यातील जुनवणे येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा २५ मे रोजी म ालेगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथे विवाह होणार होता. १६ वर्षीय मुलगी व तिचे कुटुंब २४ मे रोजीच दुपारी चारदरम्यान हळदीच्या कार्यक्रमासाठी चिंचगव्हाण येथे निघणार असत्याची माहिती २४ मे रोजी दुपारी ३.५२ वाजता चाइल्ड हेत्पलाइन १०९८ वर मिळाली.

त्यानुसार चाइल्ड हेल्पलाइन पथकाच्या समुपदेशक वर्षा पाटील निरीक्षक मुकेश महिरे, संदीप पवार यांच्या मदतीने जुनवणे येथील बालविवाह प्रतिबंध अधिकारी, ग्रामसेवक, पोलीसपाटील, सरपंचांना याविषयी माहिती देण्यात आली. त्यानुसार २४ मे रोजी अवघ्या ७ मिनिटात चाइल्ड हेत्पलाइनच्या पथकासह जुनवणे येथील ग्रामसेवकांनी मुलीच्या घरी गृहभेट घेत हळदीसाठी निघालेल्या कुटुंबाशी संपर्क साधला व त्यांना बोरकुंड येथे परत बोलावून बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार माहितीसह समज देण्यात आली.

संबंधित मुलीच्या पालकांना नोटीस बजावून २६ मे रोजी बालकल्याण समितीसमोर उपस्थित करण्यात आले. दरम्यान, मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय विवाह करून देणार नाही, असे हमीपत्र बालकल्याण समितीने मुलीच्या पालकांकडून लिहून घेतले, तसेच मुलीसोबत विवाह करीत असलेल्या मुलाच्या कुटुंबीयांनाही समज देण्यात आली.

या वेळी ग्रामसेवक राजेंद्र शिंदे. पोलीसपाटील जितेश वाघ, सरपंच योगेश पाटील तसेच चाइल्ड हेत्पलाइन १०९८ चे सुपरवायझर मुकेश महिरे, संदीप पवार यांनी कामकाज पाहिले. या दोन्ही बालविवाह प्रतिबंधक कारवाई प्रकरणी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजेंद्र भामरे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी सतीश चव्हाण व चाइल्ड हेल्पलाइनच्या प्रकल्प समन्वयक प्रतीक्षा मगर यांनी मार्गदर्शन केले.

  • अल्पवयीन मुलीशी विवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे. असा गुन्हा घडत असेल तर चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्र. १०९८ वर संपर्क करावा. या नंबरवर संपर्क करणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्ता गोपनीय ठेवण्यात येते.
    सतीश चव्हाण, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, धुळे.
---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment