राजस्थान: महिलांन बाबतच्या घटना दिवसेन दिवस वाढतच जात आहे. लग्नाला १५ वर्ष झाली तरी मुलं होत नाही या रागातून पतीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना समोर अली आहे. ही घटना राजस्थानमध्ये घडली आहे. राजस्थान मधील एक छोटासा गाव आहे भीलवाडा येथे ही घटना घडली आहे. याबाबत अशी माहिती समोर आली आहे की ममता आणि प्रभू या दोघांचे पंधरा वर्षांपूर्वी लग्न झाले.तरी अजून तुला मूल होत नाही
यामुळे पती-पत्नीमध्ये नेहमीच भांडण होत असे. गुरुवारी रात्री दारूच्या नशेत असताना.त्याने ममता हिला मारहाण केली आणि त्या दरम्यान तिचा मृत्य झाला. पत्नीचा खून झाला आहे कळताच प्रभुने तिच्या आई-वडिलांना न सांगता मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेला.गावकऱ्यांनी ममताच्या हत्येची पोलिसांना माहिती मिळाली असता. तात्काळ कारवाई करत स्मशानभूमी गाठली.ममताच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुणा आढळून आल्या आहेत. आरोपी पती आणि त्याच्या कुटुंबीयां विरुद्ध एफ.आय.आर दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.