---Advertisement---

Chopda Accident News : साफसफाई करताना कूलरचा शॉक लागून तरुणीचा मृत्यू

by team

---Advertisement---

चोपडा : आपल्या घरात कुलर असेल तर सतर्कता बाळगा, कारण चोपडा तालुक्यातील बढाई पाडा येथे कुलरच्या विजेचा धक्का लागून एका १६ वर्षीय मुलीला आपला जिव गमवावा लागला. शुक्रवार, ३० रोजी सकाळी साडे वाजता घरात लावलेल्या कुलरमधील विजेचा धक्का लागल्याने मुलीचा मृत्यू झाला.

सायजा सुक्राम पावरा असे शॉक लागून मरण पावलेल्या मुलीचे नाव आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी अडावद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सायजा पावरा ही कुटूंबियांसह बढाई पाडा येथे राहत होती. तिचा परिवार मजुरी काम करून उदरनिर्वाह करत आहे. शुक्रवारी सायजा पावरा ही घराच्या बाजूलाच असलेल्या लहान झोपडीत साफसफाई करत होती. तेथे असलेल्या कुलरमध्ये विद्युत प्रवाह उतरलेला होता. तिने कुलरला हात लावताच तिला विजेचा शॉक लागल्याने तीचा मृत्यू झाला.

नातेवाइकांनी तिला तातडीने बिडगावला आरोग्य केंद्रात नेले. मात्र, तिचा मृत्यू झाला होता. गावचे पोलिस पाटील मुसा तडवी यांच्या खबरी वरून अडावद पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---