जळगाव : घरासमोर विनाकारण दुचाकीवरुन चकरा मारू नका,असे सांगणाऱ्या तरुणाला शिवीगाळ करत दोघांनी चाकूने वार करुन दोघा भावांना जखमी केल्याची घटना गुरूवार 28 रोजी रात्री मध्यरात्रीनंतर रायपुर कुसुंबा येथे घडली. मिथुन फकीरा परदेशी (25) हे रायपूर येथे वास्तव्यास असून ते खाजगी नोकरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
त्यांच्या घरासमोरुन श्रीकांत मोहन धनगर तसेच दुर्गेश कैलास परदेशी (दोघे रा. रायपुर) हे दुचाकीने चकरा मारत होते. चकरा मारु नका कोणाला धक्का लागेल,असे मिथुन यांनी दोघांना सांगीतले. तुम्हाला जास्त झाले आहे,असे मिथुन यांना म्हणत श्रीकांत याने कमरेतुन चॉपर काढत पाठीवर तसेच हातावर वार केला.श्रीकांत याचा साथीदार दुर्गेश याने त्यानंतर हातातील चाकुने साक्षीदार विशाल फकीरा परदेशी याच्या पाठीवर वार करत जखमी केले.तसेच दोघा परदेशी बधूंना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोहेकॉ गफ्फार तडवी करत आहे.