जळगाव : येथील चंदू अण्णा नगर चौकात आमदार आमदार राजूमामा भोळे यांच्यावर जेसीबीवरून पुष्पवृष्टी करून नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. तर खोटे नगर, निमखेडी शिवारात लाडक्या भगिनींनी रांगोळ्या, फुलांच्या पाकळ्यांच्या पायघड्या घालून २१ पंचारती दिवे ओवाळीत विजयासाठी शुभेच्छा दिल्या. नागरिकांच्या भरभरून मिळणाऱ्या प्रतिसादावरून अवघे शहर भाजपमध्ये झाल्याचे स्पष्ट होते आहे. आमचा विजय निश्चित असल्याचा भाव नागरिकांच्या चेहऱ्यावरून दिसून येतो आहे.
खोटे नगर स्टॉपवरील गणपती मंदिर येथून आ. राजूमामा भोळे यांच्या दुसऱ्या टप्प्यातील रॅलीला सुरुवात झाली. तेथून धनश्री नगर, साई नगर, चंदू अण्णा नगर, गिरनाई कॉलनी, शिवधाम मंदिर, दादावाडी, हायवे दर्शन कॉलनी मार्गे माजी नगरसेविका प्रतिभा गजानन देशमुख यांचे घरी रॅली समाप्त झाली. रॅलीच्या मार्गात आ. राजूमामा भोळे यांना पेढे खाऊ घालून अनेक नागरिकांनी शुभाशीर्वाद दिले. तर एका भागात फुलांच्या, रांगोळ्यांच्या पायघड्या घालून लाडक्या बहिणींनी २१ पंचारती दिवे ओवाळून आ. राजूमामांचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले.
रॅलीत भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन इंगळे, शिवसेनेचे माजी नगरसेवक मनोज चौधरी, प्रतिभा देशमुख, प्रतिभा पाटील, डॉ. चंद्रशेखर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेश संघटक विनोद देशमुख, राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र प्रमुख फिरोज शेख, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजूभाई मोरे, रिपाई (आठवले) गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, भाजप मंडळ क्रमांक ५ चे अध्यक्ष शक्ती महाजन, भाजप अल्पसंख्याक महानगराध्यक्ष अशफाक खाटीक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला महानगराध्यक्ष मीनल पाटील, भाजपचे जिभाऊ वानखेडे, माधुरी देशमुख, संकेत शिंदे, उमेश सूर्यवंशी, रिंकू चौधरी, अनुराग पाटील, सागर पाटील, सुधीर पाटील, सविता पोळ, महेश आंबीकर, शोभा कुलकर्णी, संदीप मराठे, शिवसेनेचे पियुष कोल्हे, रोहित कोगटा, स्वप्नील परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे साजिद पठाण, कौसर काकर, अर्चना कदम, ममता तडवी, शोभा भोईटे, फैजान पटेल, कामिल शेख, रिपाई (आठवले) गटाचे युवा जिल्हाध्यक्ष मिलिंद सोनवणे, अविनाश पारधे, मिलिंद सोनवणे, प्रताप बनसोडे, नाना भालेराव, अक्षय मेघे, लोक जनशक्ती पक्षाचे मनोज निकम, आनंदा सोनवणे आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.