---Advertisement---
जळगाव : शहरातील विविध भागांमध्ये महानगरपालिकेतर्फे काँक्रिटीकरणाची रस्ते तयार करण्यात येत आहेत. या अंतर्गत गोलानी मार्केट परिसरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रस्त्याचे काम करण्यात येत आहे. परंतु, गोलानी मार्केटमधील ”देवगड हापूस आंबे” या दुकानदाराचे फलक चक्क या रस्त्याच्या मधोमध येत आहे. मात्र, याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शहरातील रस्ते अतिक्रमण धारकांना विकले आहे का ? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
शहरातील विविध भागांमध्ये महानगरपालिकेतर्फे काँक्रिटीकरणाची रस्ते तयार करण्यात येत आहेत. या अंतर्गत गोलानी मार्केट परिसरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रस्त्याचे काम करण्यात येत आहे. परंतु, गोलानी मार्केटमधील ”देवगड हापूस आंबे” या दुकानदाराचे फलक चक्क या रस्त्याच्या मधोमध येत आहे. मात्र, ते न काढताच तेथे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे.
मनपा प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप
परिणामी वाहनधारकांना येथून ये-जा करण्यास त्रास होईल. त्यामुळे हे फलक का काढण्यात येत नाही ? असा सवाल स्थानिक नागरिकांनी केला असता, त्यांना उडवा उडवीची उत्तरे देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, विकास काम करीत असताना, जर काही अडथळे आली, तर ते काढण्याचा अधिकार मनपाकडे असतो मात्र, याकडे मनपा प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नागरिकांचा संतप्त सवाल
तसेच हे फलक कोणाच्या आशीर्वादाने कायम ठेवण्यात आले आहे. का शहरातील रस्ते अतिक्रमण धारकांना विकले ? असा संतप्त सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.