जळगाव : ढगाळ वातावरणामुळे काही दिवसापूर्वी जळगाव जिल्ह्यातील उन्हाचा पारा २ ते ३ अंशांची घसरून ३७ अंशावर आला होता. मात्र शनिवारी ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. आज दुपारी १ वाजेला तापमानाचा पारा ३८ अंशावर होता. तर तो दुपारनंतर ४१ अंशापुढे जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यातील काही भागात बेमोसमी पावसाचाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून नागरिकांना उन्हाच्या चटक्यासोबतच उकाडाही सहन करावा लागत आहे.
हवामान विभागाकडून राज्यभरात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार काही दिवसापूर्वी जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा २ ते ३ अंशाने घसरून ३७ वर आला होता. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता.
मात्र त्यानंतर वातावरण निरभ्र झाल्याने पुन्हा तापमान वाढू लागले. तर शनिवारी जळगाव जिल्हयात ४१ अंश तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, राज्यातील काही भागात बेमोसमी पावसाचाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून नागरिकांना उन्हाच्या चटक्यासोबतच उकाडाही सहन करावा लागत आहे.