जळगावातून मोठी बातमी, ‘या’ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी, वाचा नेमकं काय घडलं ?

#image_title

जळगाव ।  महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने “भूतो न भविष्यती” अशी कामगिरी करून दाखवली. महायुतीचे वारू उधळले. या लाटेत महाविकास आघाडी भुईसपाट झाली. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून माजी मंत्री गुलाबराव देवकर तर, महायुतीतर्फे गुलाबराव पाटील रिंगणात होते.

या मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा पराभव केला. गुलाबराव पाटील ५९ हजार १३० च्या फरकाने विजयी झाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची चिंतन बैठक मंगळवार, ३ रोजी पार पडली. यावेळी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

विरोधी पक्षाचे पदाधिकारी खांद्याला खांदा लावून फिरत असताना आपल्या पक्षाचे तालुकाध्यक्ष व अन्य काही पदाधिकारी काम करीत नसल्याचा आरोप करुन दोन्ही कार्यकारिणी बरखास्त करा किंवा त्यांना पदावरुन दूर करा, अशी मागणी जळगाव बाजार समितीचे उपसभापती पांडूरंग पाटील यांनी केली.

त्यांच्या या आरोपाचे खंडन करताना जळगाव तालुकाध्यक्ष बापू परदेशी यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. यावेळी पाटील व परदेशी यांच्यात खडांजगी झाली. देवकरांनी मध्यस्ती करुन वाद मिटविला.

या बैठकीला जिल्हा प्रवक्ते वाल्मीक पाटील, जळगाव बाजार समिती उपसभापती पांडूरंग पाटील, युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, जळगाव तालुका अध्यक्ष बापू परदेशी, मजूर फेडरेशनचे माजी सभापती लिलाधर पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख पंकज महाजन, बाजार समिती संचालक अरुण पाटील, गोकुळ चव्हाण, धानवड उपसरपंच दिलीप चव्हाण, राजू वाघमारे, दीपक वाघमारे, मोहन पाटील, आबा देवरे, धरणगाव युवा तालुका अध्यक्ष मनोज पाटील, जळगाव तालुका युवा अध्यक्ष विनायक चव्हाण, पंकज पाटील, शिरसोलीचे अर्जुन पवार, वावडदा सरपंच राजेश वाडेकर, रंगराव पाटील, डॉ. नितीन पाटील, एन.डी. पाटील आदी उपस्थित होते.