तलाठी भरतीचा मार्ग मोकळा; नवीन आदेश जाहीर

तरुण भारत लाईव्ह । ८ एप्रिल २०२३। सहा महिन्यांपासून चर्चेत असलेल्या राज्यातील तलाठी भरती चा मार्ग आता मोकळा झाला आहे अनुसूचित क्षेत्रातील जागांवरून निघालेल्या वादावर अखेर शासनाने निर्णय घेत लेखी आदेशही जाहीर केला यात अनुसूचित क्षेत्रात अनुसूचित जमातींसह इतर प्रवर्गालाही लोकसंख्येच्या प्रमाणात संधी मिळाली आहे.

पुढील महिन्याभरात राज्यातील रिक्त असलेली ४१२२ तलाठी पदे तत्काळ भरली जातील जळगाव जिल्ह्यात साठी एक २०८ पदांची मागणी विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे पैसा क्षेत्रात सर्वच तलाठी पदे ही अनुसूचित जमाती या प्रवर्गातून भरावयाची असा राज्यपालांचा यापूर्वीचा आदेश होता. त्यानुसार राज्यातील तब्बल ११ जिल्हे हे पैसा क्षेत्रात येत असल्याने या सर्व जिल्ह्यात सरकटपणे अनुसूचित जमाती प्रवर्गातूनच शासकीय विभागातील तलाठी ग्रामसेवक कृषी सेवक शिक्षक असे विविध पदांची भरती करण्यात येणार होती परंतु अनेक जिल्ह्यात आदिवासींसह इतर प्रवर्गांची लोकसंख्या असल्याने हा त्या लोकसंख्येवर अन्याय होता. त्या विरोधात तीव्र आक्षेप नोंदवण्यात आले त्याचे दखल घेत या निर्णयात बदल करण्याची मागणी झाल्यानंतर २०१९  मध्ये राज्यपालांनी त्याबाबत आदेश दिले होते.

यात लोकसंख्येचा प्रमाणानुसार पदभरती करण्याबाबत अनुमती देण्यात आली होती परंतु त्याबाबत शासन आदेशाची प्रतीक्षा होती त्यामुळे तलाठी भरतीची डिसेंबर पूर्वीच घोषणा होऊन एप्रिल पर्यंत भरती पूर्ण करण्याची घोषणाही तांत्रिक कारणांमुळे हवेतच विरली अखेर २०२३ मध्ये प्रक्रिया सुरू झाली पेसा बाबत मार्गदर्शन मागवण्यात आले त्यात बिंदू नामावलीसह इतरही काही दृश्य आहेत का बिंदू नामावली प्रमाण रिक्त पदे किती? रिक्त पदार्थ आदिवासी आणि बिगर आदिवासी यांचे प्रमाण किती? यांची संपूर्ण माहिती विभागीय आयुक्तांकडून नाहीये मागविण्यात आली होती. त्यांच्याकडून अहवाल घेणे प्रलंबित असल्यानेच भरतीबाबत घोषणा करूनही तत्काळ करणे शासनाला शक्य झाले नव्हते ही भरती आता होणार आहे.