नागपूर : जिल्ह्यातील कळमना येथे एक मोठी ही घटना घडली आहे. शालिमार एक्सप्रेस दोन डबे रुळावरून खाली उतरले आहे. नागपूरच्या इतवारी रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला आहे. कुर्लाकडे जाणारी शालिमारकडे एक्सप्रेस नागपुरातून जात असताना कळमना भागातून काही अंतरावर अचानक रेल्वेचे दोन डबे रुळाच्या खाली उतरले.
मिळालेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक 18029 शालीमार एक्स्प्रेस मुंबईहून शालीमारकडे जात असताना नागपूरच्या इतवारी रेल्वे स्थानकाजवळ अचानक गाडीचा डब्बा क्र. S1 आणि S2 डबे रुळावरून घसरले आहेत. या अपघातात अद्यापम कोणीही जखमी नसल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनेवेळी रेल्वेचा वेग कमी असल्याने दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. रेल्वे पुन्हा रुळावर आणण्यासाठी युद्ध पातळीवर रेल्वे प्रशासनाने काम सुरू केले आहे. या दुर्घटनेमुळे हावडा मुंबई या मार्गावरील काही गाड्या प्रभावीत होण्याची शक्यता आहे. काहींचे मार्ग बदलले जाऊ शकतात. दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू असून रेल्वे मार्ग पूर्ववत होण्यासाठी आणखी दोन ते तीन तासापेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे.