मुंबई : नुकत्याच सुरू झालेल्या ‘अटल सेतू’ नंतर आज मुंबईकारणांसाठी कोस्टल रोडची एक बाजू खुली करण्यात येणार आहे आहे मुंबई महानगरपालिकाच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या कोस्टल रोडचं आज उद्घाटन होणार आहे. कोस्टल रोडची एक बाजू वाहतुकीसाठी खुली होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडचे आज उद्घाटन होणार आहे.
दक्षिण मुंबईला थेट ऊत्तर मुंबईशी जोडणारा रोड असून मुंबईसाठी हा रस्ता गेम चेंजर ठरणार आहे. कोस्टल रोड प्रोजेक्ट हा पहिल्या टप्प्यात मरीन ड्राइव ते वरळीपर्यंत आहे, जो पुढे वरळी-बांद्रा सी लिंकहून कनेक्ट होईल. पुढे हा रस्ता वरळी ते बांद्रा आणि त्यापुढे दहीसरपर्यंत जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडचे आज उद्घाटन होणार आहे. मागील आठवड्यातच मुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोडचा पाहणी दौरा करून आढावा घेतला होता.