धुळे : जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून कडाक्याची थंडी पडत आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांना सकाळी शाळेत जावे लागते, त्यामुळे त्याच्या आरोग्यवरती परिणाम होतो. अशा स्थितीत लहान बालकांना सकाळी शाळेत जावे लागत आहे. त्यामुळे शाळेच्या वेळेत बदल करण्यात यावा, अशी मागणी जिल्हा युवासेनेतर्फे जिल्हा परिषदेचे प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनात निवेदनात म्हटले आहे की, प्राथमिकपासून तर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ग्रामीण भागातून विद्यार्थी भल्या पहाटे येत असतात. अशावेळी त्यांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागतो. काही पालक तर पाल्यांना शाळेपर्यंत सोडण्यासाठी येत असतात. त्यांनाही थंडीचा त्रास होतो. अनेक लहान मुलांना सर्दी व खोकल्याचे आजार उद्भवले असून सकाळच्या सत्रातील शाळांचे वेळापत्रकात बदल करावा. दरम्यान, काही शाळा वेळ बदलण्यास तयार नाही, असे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना सांगितले. आदेश न जुमानणाऱ्या शाळांना तत्काळ नोटिसा बजावण्यात आल्या.