जळगाव : अभियंता भवनाची निर्मिती खूपच सुंदर आहे. भवनाच्या माध्यमातून दिसणारी क्रिएटीव्हीटी, सुंदर पेन्टिंग, राष्ट्रपुरूष, शास्त्रज्ञ, संत यांचे फोटो तसेच विविध धरणांचे फोटोसह माहिती ही सुरेख असून अभियंता भवन जिल्ह्याचे भूषण म्हणून ओळखले जाईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केले. जळगाव जिल्हा शासकीय अभियंता पतपेढीच्या अभियंता भवनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागाचे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे सचिव डॉ. संजय बेलसरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.
अभियंता भवनाच्या प्रवेशव्दारावर कृष्णराज सागर धरणाची प्रतिकृती साकारली आहे. अग्रस्थानी असलेल्या भारतरत्न डॉ.मोक्षगुडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेेचे पूजन मान्यवरांनी केले. वाचनालय व ग्रंथालयाचे उद्घाटन आमदार सुरेश भोळे यांनी केले. यावेळी व्ही.डी.पाटील, एच. एम. शिंदे, जळगाव पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक वाय.के. भदाणे, वाघूर धरण विभागाचे कार्यकारी अभियंता जी.एस. महाजन, मध्यम प्रकल्प विभाग क्र.1 चे कार्यकारी अभियंता विनोद पाटील, लघू पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे, जळगाव पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता आदिती कुलकर्णी, जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे सहायक अधीक्षक पी.बी.पाटील, उपविभागीय अभियंता आरती सूर्यवंशी, एस.एच. चौधरी, के.पी. पाटील, चोपड्याचे डॉ.अतुल पाटील, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.
संस्थेचे चेअरमन इंजि. साहेबराव पाटील, व्हा.चेअरमन एस.पी.मोरे, संचालक मंडळाचे एस.व्ही. पाटील, एस.एन. पाटील, डी.जे. निकम, व्ही.एस. पाटील, आर. एन. पाटील, संचालिका स्वाती नन्नवरे यांनी स्वागत केले. जलसंपदा विभाग लाभक्षेत्रे विकास सचिव संजय बेलसरे यांनी आनंद व्यक्त करीत वास्तूची प्रशंसा केली. चेअरमन साहेबराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. दीपक निकम, स्वाती नन्नवरे यांना भारतरत्न डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या अभियंता पुरस्काराने गौरविण्यात आले. बाळासाहेब भदाणे यांच्या वतीने अधीक्षक अभियंता वाय.के.भदाणे यांनी पुरस्कार स्वीकारला. सामाजिक क्षेत्रातील विश्वेश्वरय्या विशेष गौरव पुरस्कार दीपस्तंभ फाऊंडेशनच्या मनोबल शाखेस तर शाहिरी कला जिवंत ठेवणाऱ्या नगरदेवळा येथील शाहीर शिवाजीराव पाटील (अध्यक्ष लोकरंग फाऊंडेशन) यांना देण्यात आला.सोहळ्यात सभासदांच्या गुणवंत पाल्यांनाही गौरविण्यात आले. सूत्रसंचालन अपूर्वा वाणी यांनी केले. आभार संचालक व्ही. एस. पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी एस.एच.चौधरी, सचिव प्रेमराज पाटील, लिपिक राजेंद्र पाटील, विश्वेश पाटील यांचे सहकार्य लाभले.