जळगाव : पश्चिम बंगाल मधील कोलकाताच्या घटनेच्या देशात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ इकरा युनानी मेडिकल कॉलेजतर्फे निषेध रॅली काढण्यात आली. रॅली काव्यरत्नावली चौक ते आकाशवाणी चौक यामार्गाने काढण्यात आली.
रॅलीमध्ये इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार, प्राचार्य डॉ. मोहम्मद अब्दुल कुद्दुस, उप-प्राचार्य डॉ. शोएब शेख, डॉ. नसीम अन्सारी, डॉ. अजिम काझी, डॉ. अनिस शेख, डॉ. समिना खान, डॉ. नाजेमा खान, डॉ. सुमेया सालार, डॉ. गझाला अन्सारी, डॉ. एजाज शाह, डॉ. मुजिब पिंजारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्याने सहभाग घेतला.
रॅलीच्या प्रारंभी डॉ. अब्दुल करीम सालर यांनी मनोगत केले. त्यांनी सांगितले कि, आपल्या देशात महिला सुरक्षा हा गंभिर विषय आहे. आणि आज देशात आई, बहिण सुरक्षीत नाही. चार चार वर्षाच्या मुली सुरशित नाही. डॉक्टर महिला ह्या 24 तास डुयटी करता, त्या सुध्दा सुरक्षित नाही. देशात कडक कायदा पाहिजे त्यामुळे महिला ह्या सुरक्षित राहातील.
काव्यरत्नावली चौक ते आकाशवाणी चौक यामार्गाने येऊन भाऊच्या उद्यान जवळ रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या घटनेचा तीव्र निषेध् करत रॅलीचे समारोप करण्यात आला.