धरणगाव : पैशांच्या बदल्यात कमिशन देण्याच्या आमिषाने एका तरुणाची ३ लाखात ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी धरणगाव पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पैशांच्या बदल्यात कमिशन, तरुणाची तीन लाखात फसवणूक
by team
Published On: जानेवारी 12, 2023 8:45 pm

---Advertisement---
पोलीस सुत्रानुसार, मूर्तजा अहमद शेख इसहाक (30) हे शहरातील रा. मराठे गल्लीत वास्तव्यास आहेत. मूर्तजा यांच्या मोबाईलवर टेलिग्राम अॅपवर आहे. 19 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2022 च्या दरम्यान प्रिया नावाच्या आयडीवरून मेसेज आला व पैसे गुंतविण्याच्या आमिषानंतर त्या बदल्यात कमिशन मिळेल, असे सांगितल्यानंतर अमिषाला बळी पडून मुर्तजा यांनी अमेझॉन पे व पे टीएम अकाउंटवरून तीन लाख 10 हजार 864 रुपये पैसे पाठवले. परंतू पैसे स्वीकारून देखील मुर्तजा यांना कोणत्याही प्रकारचे कमिशन देण्यात आले नाही.
त्यांनी 9921799488 या कस्टमर केयर मोबाईल नंबरवर फोन करून पैशांची मागणी केली परंतु याठिकाणी देखील त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री होताच मुर्तजा यांनी धरणगाव पोलिसात धाव घेत टेलिग्राम अँप वरील प्रिया7187 या अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ करीत आहेत.