नुकतेच सावदा शहरात गोमांस व अवैध गुरे वाहतूक व कत्तलखान्यामुळे जीवहानीचे विध्वंस कृत्य झाले त्यामुळे काही काळ सावदा शहरातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली त्याचप्रमाणे काही माथेफिरू समाजकंटक फैजपूर शहरातील जातीय सलोखा व कायदा सुव्यवस्था हेतू पुरस्कार बिघडवण्यासाठीच सदर गोमांस सदृश्य पोती शहरातील रस्त्यांवर टाकण्याचा उपद्रव करून हिंदूं – मुस्लिम जातीय सलोखा धोक्यात आणण्याचा कुटील प्रयत्न करीत आहेत.
फैजपूर शहरात जातीय सलोखा धोक्यात आणण्याचा समाज कंटकांकडून होतोय प्रयत्न, काय आहे प्रकरण?
by team
Updated On: डिसेंबर 3, 2022 12:07 pm

---Advertisement---
तरुण भारत लाईव्ह न्यूज । २ डिसेंबर २०२२ । फैजपूर शहरात गेल्या चार-पाच दिवसात किमान तीन वेळा भुसावळ रस्त्यावरील पिंपरुड फाटा ते जगनाडे परिसर दरम्यान गोमांस सदृश्य पोती रस्त्याच्या कडेला जाणून बुजून कोणीतरी अज्ञात समाजकंटक टाकून शहरातील कायदा सुव्यवस्था धोक्यात घालण्याचा प्रयत्न करीत आहे. या बाबी महसूल व पोलीस प्रशासनाने वेळीच दखल घेऊन या समाजकंटकांच्या मुस्क्या आवराव्या, अशी मागणी शहरवासीयांकडून व्यक्त होत आहे
फैजपूर शहरात होणाऱ्या या अवैध – अप्रिय गैरप्रकार बाबी पोलीस प्रशासन अद्यापही छडा लावू शकले नाही, यामुळे शहर वासियांमध्ये मोठा रोष व्यक्त केला जात आहे या बाबी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जातीने लक्ष घालावे अशी मागणी व्यक्त होत आहे.
शहरातील सदर प्रकारावर पोलिस प्रशासन लक्ष ठेवून आहे सदर पोत्यातील मधील मांस/ चामडी तपासणी साठी पाठविले असून त्या अहवाल नंतर गुन्हा दाखल करण्यात येणार – सपोनि सिध्देशवर आखेगवकर