Voltas: टाटा समूहाचा भाग असलेल्या व्होल्टासने नुकताच आपला तिमाही अहवाल सादर केला आहे. या तिमाहीत कंपनीचा नफा 3 पटीने वाढला आहे. जुलै-सप्टेंबर या तिमाहीत कंपनीने 132.83 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या उत्पादनाची विक्री ५६ टक्क्यांनी वाढली आहे, त्यामुळे कंपनीचा नफा प्रचंड वाढला आहे.
व्होल्टास ही कंपनी वैयक्तिक वापरापासून ते व्यावसायिक वापरापर्यंत एसी प्लांट बसविण्याचा व्यवसाय करत आहे. जुलै-सप्टेंबर या तिमाहीत व्होल्टासचा एकत्रित निव्वळ नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत 3 पटीने वाढला आहे आणि कंपनीच्या रूम एसीची विक्री 56 टक्क्यांनी वाढली आहे.
शेअर बाजाराला पाठवलेल्या माहितीत व्होल्टास लिमिटेडने सांगितले की, गेल्या वर्षी जुलै-सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 35.65 कोटी रुपये होता. या कालावधीत, व्होल्टासचे ऑपरेटिंग उत्पन्न 14.23 टक्क्यांनी वाढून 2,619.11 कोटी रुपयांवर पोहोचले, जे एका वर्षापूर्वी याच कालावधीत 2,292.75 कोटी रुपये होते.
जुलै-सप्टेंबरमध्ये व्होल्टासचा एकूण खर्च 10.74 टक्क्यांनी वाढून 2,486.89 कोटी रुपये झाला आहे. व्होल्टासचा एकूण महसूल, ज्यामध्ये इतर उत्पन्नाचाही समावेश आहे, जुलै-सप्टेंबर तिमाहीत 16.53 टक्क्यांनी वाढून 2,754.58 कोटी रुपये झाला आहे.
उन्हाळ्यात वाढली व्होल्टासची विक्री
व्होल्टास लिमिटेडच्या एकूण विक्रीवर नजर टाकली तर चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 45 टक्के वाढ झाली आहे. यावर्षी उन्हाळा थोडा जास्त काळ टिकल्याने कंपनीच्या एसीच्या विक्रीत 50 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्याचबरोबर कंपनीच्या होम अप्लायन्स ब्रँड ‘व्होल्टास बेको’च्या विक्रीतही या काळात वाढ झाली आहे. मंगळवारी कंपनीचा शेअर 1770.50 रुपयांवर बंद झाला.