---Advertisement---
---Advertisement---
जळगाव : जिल्हा सरकारी नोकरांची पतपेढी (ग. स. सोसायटी) च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. ग.स. सोसायटीचे अध्यक्ष अजबसिंग पाटील हे वार्षिक अहवाल सादर करताना, लोकमान्य गटाचे अध्यक्ष मगन पाटील यांनी विरोध दर्शवत त्यांना माहिती मांडण्यात अडथळा निर्माण केल्याचे समोर आहे आहे.
नेमकं काय घडलं
जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात रविवारी (२७ जुलै) ग. स. सोसायटीची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यावेळी ग.स. सोसायटीचे अध्यक्ष अजबसिंग पाटील हे वार्षिक अहवाल सादर होते. दरम्यान, लोकमान्य गटाचे अध्यक्ष मगन पाटील यांनी विरोध दर्शवत त्यांना माहिती मांडण्यात अडथळा निर्माण केला. मगन पाटील यांनी व्यासपीठावर जाऊन आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला असता, विरोधी सहकार गट, प्रगती गट आणि लोक सहकार गटाच्या सत्ताधारी सदस्यांनी त्यांच्याजवळील माईक हिरावून घेतल्याचा आरोप मगन पाटील यांनी केला. तसेच ग.स. सोसायटीच्या कर्जावरील व्याज कमी करावे, नोकरभरती करू नये, यासह विविध मागण्या व प्रश्न मांडायचे होते मात्र, सभासदांनी त्यांना बोलू दिले नाही, असा आरोप करत त्यांनी सहकार गट, प्रगती गट आणि लोक सहकार गटाचा निषेध व्यका केला आहे.
काय म्हणाले ग. स. सोसायटीचे अध्यक्ष ?
मगन पाटील हे यापूर्वी ग. स. सोसायटीचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यामुळे अनुभवी अध्यक्षांकडून सभेत गोंधळ घालण्याची अपेक्षा नव्हती. त्यांचे म्हणणे आणि निवेदन स्वीकारले असून, त्यांचे प्रास्ताविक झाल्यावर त्यांना बोलण्याची संधी दिली होती, परंतु त्यांनी आपले मत मांडले नाही.
- ग. स. सोसायटीचे अध्यक्ष अजबसिंग पाटील