…तर मतदारसंघात ‘सांगली पॅटर्न’ हॊईल, नाना पटोलेंना कार्यकर्त्यांचा इशारा

#image_title

राज्यातील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता काही दिवस शिल्लक आहेत. राज्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षातील जागा वाटपाकडे जनतेच लक्ष लागून आहे. त्यात अद्याप महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर झाले नाही. परंतु जागावाटप संदर्भात मात्र मतभेद जोरात सुरु आहे.


महाविकास आघाडीत चर्चेचा विषय ठरलाय नागपूर विधानसभा मतदारसंघ. नागपूरमध्ये विधानसभेचे सहा मतदारसंघ आहे. मात्र, काँग्रेसकडे असलेल्या दक्षिण नागपूर आणि रामटेक विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटानं दावा केला. यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस घरोघरी पोहोचलेला पक्ष आहे. तर शिवसेनेचा इथे संघटन सुद्धा नाही. नागपुरातील सहाही विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे रहावेत, अशी मागणी नागपुरातील काँग्रेस नेते आणि इच्छुक उमेदवारांनी केली आहे.

त्यासाठी आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, गिरीष पांडव, संगीता तलमले यांच्यासह अनेक नेते मुंबईत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. नागपुरातील एकही जागा मित्रपक्षाला गेल्यास मतदारसंघात ‘सांगली पॅटर्न’ आणि राजीनामा देण्याचा इशारा काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी दिला आहे.

दरम्यान, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली आहे. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटलं, “महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार आहे. उद्धव ठाकरे रूग्णालयात होते. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आम्ही गेलो होतो. त्यांची प्रकृती ठीक आहे. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत.