महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपली दुसरी यादी जाहीर केली होती. त्याच पाठोपाठ आता काँग्रेसनेही आपली दुसरी यादी जाहीर केली आहे . या यादीत कॉंग्रेसने २३ उमेदवारांना संधी दिली आहे.
महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये 90-90-90 असा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली होती. त्याप्रमाणे उमेदवार यादी जाहीर करण्यात येत आहे.
कोणाला मिळाली संधी ?
जालना – कैलास गोरंट्याल
छत्रपती संभाजीनगर पूर्व : मधुकर देशमुख
वसई : विजय पाटील
कांदिवली पूर्व -:काळू बधेलिया
चारकोप – यशवंत सिंग
सायन कोळिवाडा : गणेश यादव
श्रीरामपूर : हेमंत ओगले
निलंगा : अभय कुमार साळुंखे
शिरोळ : गणपतराव पाटील
सावनेर – अनुजा केदार
नागपूर दक्षिण – गिरिश पांडव
कामठी – सुरेश भोयर
भंडारा – पूजा ठवकर
अर्जुनी मोरगाव – दिलिप बनसोड
आमगाव – राजकुमार पुरम
राळेगाव – वसंत पुरके
यवतमाळ – अनिल मांगुलकर
आर्णी – जितेंद्र मोघे
उमरखेड – साहेबराव कांबळे
भुसावळ – राजेश मानवतकर
जळगाव जामोद – स्वाती वाकेकर
अकोट – महेश गणगणे
वर्धा – शेखऱ शेंडे