---Advertisement---

Congress Candidates: काँगेसच्या ‘या’ नेत्याने घेतली माघार, जागावाटपावरून ‘मविआ’त पुन्हा वाद?

by team
---Advertisement---

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आपली तिसरी याद जाहीर केली . या यादीत यादीत सचिन सावंत यांना अंधेरी पश्चिम हा मतदारसंघ दिला आहे. मात्र सचिन सावंत हे या मतदारसंघातून लढण्यास इच्छुक नाहीत. त्यांनी वांद्रे पूर्व हा मतदारसंघ मागितला आहे. त्यामुळे आता या जागेवरुन महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून पुन्हा तिढा निर्माण होण्याची आहे.

काँग्रेसचे सचिन सावंत यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली होती . मात्र ‘मविआ’च्या जागा वाटपात वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सोडण्यात आला आहे. ठाकरे गटाकडून या मतदार संघात वरुण सरदेसाई उमेदवार आहेत. सचिन सावंत यांना काँगेस पक्षाकडून अंधेरी पश्चिम या मतदार संघातून उमेदवारी मिळाल्याने ते नाराज आहेत. तिसरी यादी जाहीर केल्यानंतर काही वेळातच सचिन सावंत यांनी आपली उमेदवारी माघारी घ्यावी अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्येही खळबळ उडाली आहे.

सचिन सावंत यांना अंधेरी पश्चिम हा मतदारसंघ दिला आहे. मात्र सचिन सावंत हे या मतदारसंघातून लढण्यास इच्छुक नाहीत. त्यांनी वांद्रे पूर्व हा मतदारसंघ मागितला आहे. त्यामुळे आता या जागेवरुन महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच पाहण्यास मिळणार अशी चिन्हं आहेत. याबाबत त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट केली आहे.

सचिन सावंत यांची पोस्ट
“मी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. तिथेच लढावे अशी माझी इच्छा होती. परंतु तो मतदारसंघ शिवसेना उबाठा पक्षाकडे गेला आहे. मी अंधेरी पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती. तरी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मनापासून धन्यवाद! परंतु मी महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्निथला यांना पक्षाने निर्णय बदलावा याकरिता विनंती केली आहे. मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी माझ्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील ही आशा बाळगतो.” अशी पोस्ट सचिन सावंत यांनी केली आहे.

#image_title

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment