---Advertisement---
जामनेर : जळगाव जिल्हयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी आता सर्वच पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. काही ठिकाणी युती आघाडी होण्याचं चिन्ह आहे तर काही ठिकाणी सर्वच पक्ष निवडणुका स्वबळावर लढू शकतता, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र या निवडणुकीपूर्वी आता पक्षांतराला वेग आला आहे.
अनेक इच्छुक उमेदवार या पक्षातून त्या पक्षात जाताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे. अर्थात जामनेर तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष शंकर राजपूत यांनी आज रविवारी (ता. १६) मुलगा आणि माजी युवक अध्यक्ष दीपक राजपूत यांच्यासह भाजपा प्रवेश जाहीर केला आहे.
जामनेरच्या सर्वांगीण विकासासाठी निर्णय
मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास आणि जामनेरच्या सर्वांगीण विकासासाठी हा निर्णय घेत असल्याची भावना राजपूत यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली.
काही वेळात होणार प्रवेश
जामनेर तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष शंकर राजपूत यांनी मुलगा आणि माजी युवक अध्यक्ष दीपक राजपूत यांच्यासह भाजपा प्रवेश जाहीर केला आहे. काही वेळात मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत राजपूत आपल्या समर्थकांसह भाजपा प्रवेश करत आहेत.









