जळगाव : शहरातील नागरिक विविध समस्यांनी ग्रस्त आहेत. त्यामुळे या समस्यांकडे महापालिकेचं लक्ष वेधून घेण्यासाठी जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज, मंगळवारी महानगरपालिकासमोर आंदोलन करण्यात आलं. या वेळी शहर अभियंता मनीष अमृतकर यांनी आयुक्तांच्या वतीने निवेदन स्वीकारले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार, शहर जिल्हाध्यक्ष श्यामकांत तायडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. या प्रसंगी काँग्रेस शहर सरचिटणीस दीपक सोनवणे, शहर प्रवक्ता शफी बागवान, इंटक अध्यक्ष श्रीधर चौधरी, शहर सरचिटणीस राहुल भालेराव, शहर उपाध्यक्ष जाकिर बागवान, सरचिटणीस विजय वाणी, युवक अध्यक्ष मुजीब पटेल, मीराताई सोनवणे, छायाताई कोरडे, मीनाक्षीताई जावळे, रवींद्र चौधरी, गणेश राठोड, झोपडपट्टी विभागाचे अध्यक्ष अण्णा जाधव, अर्चना गाडे, मनोज वाणी, रफिक शेख, श्रीकांत शिरसाट, शकील खान, एडवोकेट विजय दर्जी, किरण अडकमोल, समाधान पाटील, अरुण लोहार, अरुण चव्हाण, शिवाजी शिंपी, मालोजी पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मागण्या तात्काळ सोडवणार – आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे
जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले आहे. या मागण्या रास्त असून आम्ही आमच्या स्तरावर त्या लवकरात लवकर सोडवू, असे आश्वासन आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाला भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करतांना दिले.