---Advertisement---

Jalgaon Crime News : लाच स्विकारताना हवालदार एसीबीच्या जाळ्यात

by team
---Advertisement---

जळगाव : वाळूची अवैध वाहतूक करु देण्यासाठी दोन लाखांची मागणी करण्यात आली होती. परंतु, तडजोडीनंतर पन्नास हजार रुपयाची लाच स्वीकारताना पोलीस हवालदाराला जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवार २६ जुलै रोजी भडगाव पोलीस स्टेशनच्या आवारात रंगेहाथ अटक केली. किरण रविंद्र पाटील (वय 41, व्यवसाय नोकरी, पोलिस हवालदार भडगाव पोलिस स्टेशन) असे आरोपी हवालदाराचे नाव आहे.

तक्रारदार भडगाव येथील रहिवाशी आहे. त्यांना भडगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत किरण रवींद्र पाटील यांनी गुरुवार २५ जुलै रोजी तक्रारदाराकडे वाळू वाहतूक करण्यासाठी तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी हवालदार किरण पाटील याने  2 लाख 60 हजार रुपये लाचेची मागणी केली.  यासंदर्भांत तक्रारदाराने  लाच प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.   यातील पहिला हफ्ता म्हणून तडजोडीअंती 50,000 रुपये देण्याचे ठरले. हि  50,000 रुपयांची लाचेची रक्कम स्विकारताना किरण पाटील यांना लाचलुचपत विभागाच्या पथकाद्वारे रंगेहाथ पकडण्यात आले. हि कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उप अधिक्षक सुहास देशमुख ,पोलिस निरीक्षक नेत्रा जाधव, पोलीस उप निरीक्षक दिनेशसिंग पाटील, पोलीस कॉन्सटेबल राकेश दुसाने, पोलीस कॉन्सटेबल अमोल सुर्यवंशी यांच्या पथकाने केली. याबाबत भडगाव पोलीस स्टेशन येथे संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment