तरुण भारत लाईव्ह । १२ जानेवारी २०२२ । जळगाव – औरंगाबाद महामार्गाला लागुन पाळधी येथून उत्तरेकडे एक कि.मी अतंरावर असलेल्या मल्हारा यांच्या मालकीचे नवीन पेट्रोल पंपाचे बांधकाम सुरू आहे. या कामासाठीचे गौण खनिज कोणतीही परवानगी न घेता शासकीय जागेतून उचलल्याने महसूल विभागाने या पेट्रोलपंप चालकास ३ कोटी ७ लाख एवढा दंड ठोठावला आहे.
पेट्रोलपंप चालकाने बांधकामास लागणारे साहित्य मुरूम,डबर, रेती याची जामनेर तहसील मधून कोणत्याही प्रकारची महसून प्रशासनाची परवानगी न घेता तसेच शासनाची रॉयल्टी न भरता बांधकाम साहित्य उचलले व कामाला सुरुवात केल्याची माहिती महसूल विभागास मिळताच महसूल विभागाने घटनास्थळाचा पंचनामा केला.
यासाठी तलाठी,मंडळ अधिकारी पाळधी, तलाठी प्रमोद इंगळे यांनी गट नं १२३९/२ येथे प्रत्यक्ष पाहणी केली असता सदर गटामध्ये अंदाजे पूर्व पश्चिम ७८ मीटर लांब व उत्तर दक्षिण ४५ मीटर लांब अंसे बांधकाम केलेले असुन बांधकामसाठी तसेच जागेवर मुरुम १००० ब्रास रेती ५०० ब्रास,डबर ८०० ब्रास अंदाजे २३०० ब्रास असल्याचे दिसून आले. घटनास्थळाचा पंचनामा तलाठी प्रमोद इंगळे यांनी केला. त्यांनुसार मालकाने महसुली विभागाकडुन मुरुम, रेती, डबर यांची कोणतेही परवानगी घेतली नाही असे यावेळी तलाठी यांनी झालेला पंचनामा हा जामनेर तहसीलदार यांच्याकडे दिल्यानतंर अरुण शेवाळे यांनी आशिष राजेंद्र मल्हारा यांना पेट्रोल पंप बांधकामावरील वापरलेल्या गौणखनिजाचे आणि अनधिकृतपणे उत्खनन करून वाहतूक केली असल्याने संबंधित मालकास ३ कोटी ७ लाख ४६ हजार ५०० रुपये दंडात्मक कारवाईची नोटीस देण्यात आली आहे. नोटीस देतांना कोतवाल रतन गायकवाड, तलाठी प्रमोद इंगळे व शेतकरी बांधव उपस्थित होते.