Nashik News: अंधश्रद्धा ही समाजातील एक मोठी समस्या आहे. शिक्षण, विज्ञान आणि तर्कबुद्धीचा प्रसार झाल्यानंतरही अनेक लोक अंधश्रद्धांना बळी पडतात. याचा गैरफायदा काही भोंदू बाबा, मांत्रिक- घेऊन अनेक लोकांची आर्थिक फसवणूक देखील करता. अशीच काहीशी घटना नाशिक शहरातून उघडकीस आली आहे. ज्याठिकाणी एका मांत्रिकाने महिलेची अडीच लाख रुपयांची फसवणूक केली आहे.
नाशिकमध्ये राहणाऱ्या एका महिलेच्या घरात सतत आजारपण आणि आर्थिक अडचणी येत असल्याने, तिने कानपूरच्या एका मांत्रिकाचा सल्ला घेतला. मांत्रिकाने एक दिवसाच्या पूजेद्वारे सर्व समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले आणि त्यासाठी अडीच लाख रुपयांची मागणी केली. महिलेने हा खर्च केला, परंतु अपेक्षित परिणाम न मिळाल्याने, तिने ग्राहक मंचाकडे धाव घेतली.
हेही वाचा : Crime News: जालन्याची मोनिका ठरली ‘लव्ह जिहाद’ची बळी; शेतात नेत इरफानने केले असे की, अंगावर येईल काटा
तक्रारीत, महिलेने मांत्रिकाच्या यूट्यूबवरील दावे, जाहिराती आणि पैसे दिल्याची पावती सादर केली. ग्राहक मंचाने या प्रकरणाची दखल घेत, मांत्रिकाला ५०,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या घटनेवर भाष्य करताना, अशा फसवणुकीच्या प्रकरणांवर कठोर कारवाईची गरज व्यक्त केली आहे.
हा प्रसंग अंधश्रद्धेच्या विरोधातील लढाईत एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे. ग्राहक मंचाने अशा तक्रारींची दखल घेऊन, फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई केल्यास, समाजातील अंधश्रद्धा कमी होण्यास मदत होईल.
अंधश्रद्धा निर्मूलनाच्या दृष्टीने हा निर्णय एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकतो. कारण मांत्रिक, बाबाबाजी यांच्याकडे उपचार घेणारे अनेक लोक मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक सहन करतात.
जिथे मांत्रिकांवर कायदेशीर बंदी आहे, तिथेही लोक अद्याप अंधश्रद्धेच्या चक्रात अडकलेले दिसतात. ग्राहक मंचाने दिलेल्या या निकालामुळे एका महिलेचा न्याय नक्कीच झाला, पण त्याच वेळी, अशा प्रकरणांमध्ये न्यायसंस्थेने अंधश्रद्धेच्या विरोधात अधिक ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे.
मांत्रिकांवर बंदी असतानाही छुपा व्यवसाय केला जातो. मांत्रिकामुळे फरक पडला नाही आणि संबंधित महिलेने ग्राहक मंचाकडे तक्रार केली व ग्राहक मंचानेही तक्रारीची दखल घेत मांत्रिकाला दंड ठोठावला. या विचित्र प्रकाराने महिलेला न्याय मिळाला. पण या निकालामुळे अंधश्रद्देला अप्रत्यक्षपणे खतपाणी घातल्याचं दिसत आहे. राज्यातील हि पहिलीच घटना असून सध्या याची चर्चा सुरू आहे.