---Advertisement---

Nashirabad News : नशिराबाद येथे दूषित पाणीपुरवठा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

by team
---Advertisement---

नशिराबाद : पाणीपुरवठा योजनेमार्फत बिर्ला टप्पा रामपेठ भागामध्ये गेल्या एक महिन्यापासून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. याबद्दल नगरपरिषद पाणीपुरवठा विभागात तक्रार देण्यात आली होती. तरीही पाणीपुरवठा चांगल्या पद्धतीने होत नसून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचं चित्र आहे. परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून गटारीचे दूषित पाणीपुरवठा केला जात असल्याचं बोललं जात आहे. यामुळे या भागात राहणाऱ्या अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

दरम्यान या भागातला जोडणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईन मध्ये गटारीच्या दूषित पाणी मिसळत असल्याचे चिन्ह दिसत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाणी प्यायल्याने नागरिकांना उलटी व जुलाबाचा वारंवार त्रास होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

सदर दूषित पाण्याबद्दल नगरपालिकेमध्ये काही नागरिक पाण्याचे नमुने घेऊन मुख्याधिकारी सोनवणे यांना दाखविण्यासाठी गेले असता त्यांनी नागरिकांना कुठलाही प्रतिसाद दिला नाही. तसेच सोनावणे यांनी कोणत्याही अधिकारी वर्गाला संबंधित प्रकाराबद्दल सूचना दिलेल्या नाहीत. तरी नगरी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीरता ओळखून पाणीपुरवठ्याची  सखोल तपासणी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 नगर परिषद प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे या दूषित पाण्यामुळे कोणाचा जीव गेला तर त्या जबाबदार कोण राहणार ? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. तरी या दूषित पाण्याचा बंदोबस्त न केल्यास या भागातील रहिवासी नगरपरिषदेवर मोर्चा नेण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment