जळगाव : जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत दरमहिन्याला पाण्याचे नमुने घेऊन जिल्हाभरातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तपासणी केली जाते. मागील मार्च महिन्यातजिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत १ हजार ६३२ पाण्याचे नमुने तपासण्यात आले. त्यात पाच तालुक्यातील ८ गावांमध्ये पिण्याच्या पिण्याचा दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे यातून समोर आले.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत साथीच्या आरोग्याचा फैलाव होऊ नये यासाठी दरमहा पाण्याचे नमुने घेऊन तपासणी केले जाते. जिल्ह्यातील गावागावात जाऊन या आरोग्य विभागातर्फे पाण्याचे नमुने जिल्हा परिषदेतून घेतले जातात. दूषित पाणीपुरवठा होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून उपायोजना केल्या जातात. जिल्ह्यात जामनेर. तालुक्यात २ ठिकाणी दूषित पाण्याचे नमुने आढळून आले आहेत. फत्तेपू र प्राथमिक आरोग्य केद्रांतर्गत पिंळगाव आणि वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्राने केलेल्या तपसाणीत वडाळी येथे दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे तपसाणीत निष्पन्न झाले आहे. त्याचप्रमाणे पाचोरा तालुक्यातील वरखेडी आरोग्य केंद्रांतर्गत निभोरी बु. तर यावल तालुक्यात साकळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २ गावांमध्ये दूषित पाणी नमुने तपासणीत आढळून आले आहे. अमळनेर तालुक्यातील जानवे, भुसावळ तालुक्यात पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे झालेल्या तपासणीत रखेडा व तळेवल याठिकाणी दूषित पाणी मिळून आले आहे. प्राथमिक आरोग्य केद्रांतर्गत पिंळगाव आणि वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्राने केलेल्या तपसाणीत वडाळी येथे दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे तपसाणीत निष्पन्न झाले आहे. त्याचप्रमाणे पाचोरा तालुक्यातील गावांमध्ये दूषित पाणी नमुने तपासणीत आढळून आले आहे. अमळनेर तालुक्यातील जानवे, भुसावळ तालुक्यात पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे झालेल्या तपासणीत रखेडा व तळेवल याठिकाणी दूषित पाणी मिळून आले आहे.
जिल्ह्यात साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हारात आरोग्य विभागामर्फत विविध उपाययोजना राबविल्या जातात. त्याच पार्श्वभुमीवर आरोग्य विभागामार्फत प्रत्येक महिन्याला ग्रामस्थांना पुरवठा होणाऱ्या पाण्याची तपासणी केली जाते.
– डॉ. सचिन भायेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. जळगाव