आदीवासी कोळी जमातीचा अवमान ; संबंधितांना निलंबित करा ; आदिवासी कोळी बांधवांची मागणी

जळगाव : आदीवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (पुणे) आयुक्तांनी बोगस हा शब्द प्रयोग केला. यामुळे बैठकीत एकच गोंधळ उडाला. बोगस शब्द प्रयोग करणाच्या अदीवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त डॉ. राजेंद्र भारुडे यांना तातडीने निलंबित करा यासह इतर मागण्यांचे निवेदन आदिवासी कोळी आंदोलन समन्वय समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

निवेदनाचा आशय असा की,  नंदुरबार येथील जात पडताळणी समितीचे काम अंत्यत मनमानीपणे चालते. कोर्टाने या समितीच्या सदस्यांना दंडही ठोठावला आहे. या समितीने बेकायदेशीर कृत्य व दिलेल्या अधिकारांचा गैरप्रकार केल्याचे ताशेरे कोर्टाने ओढले आहे. तसेच डॉ. किरण लहामटे, विधानसभा उप अध्यक्ष नरहरी झिरखळ यांची आमदारकी रद्द करावी.  कारण यांनी अदिवासी टोकरे कोळी जमातीची खोटी माहिती बैठकीत दिली. तसेच डॉ. किरण लहामटे यांनी स्वतः हा फेसबुकवर बोगस कोळींची बैठक उधळली असे प्रसिद्ध केले आहे.  आमदार शपथ घेत असताना कुठल्याही जाती विषयी, धर्मा- विषयी भेदभाव करणार नाही अशी संविधानिक शपथ घेतात,  म्हणून त्यांनी पवित्र संविधानाचा सुद्धा अपमान केला आहे. यामुळे आमच्या आदिवासी कोळी बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत .  त्यामुळे त्यांच्यावर आमदारकी रद्द करण्याची कारवाई करुन समाजाला न्याय द्यावा .  अन्यथा आगामी काळात आदिवासी कोळी जमातीच्या वतीने राज्यात चक्का जाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे .  निवेदन देतांना प्रा. भाऊसाहेब सोनवणे ,  मंगला सोनवणे ,  प्रल्हाद सोनवणे ,  तुषार सैंदाणे, बाळासाहेब सैंदाणे, भरत पाटील ,  शोभा कोळी ,  आकाश कोळी ,  विजय मोरे ,  दिगंबर सोनवणे ,  युगांत जाधव ,  गौरव कोळी ,  विजय सपकाळे ,  जगदीश कोळी ,  संदीप कोळी ,  बापू ठाकरे ,  विशाल सपकाळे  आदी उपस्थित होते .