---Advertisement---
उत्तम काळे
भुसावळ : शहरात नव्हे तर जिल्ह्यात कुप्रसिद्ध असलेला ‘लव जिहाद’ प्रकरणातील मुख्य संशयित हुस्नोद्दीन नामक व्यक्तीस दीपनगर येथेही मोठे ठेके देण्यात आले असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे या कुप्रसिद्ध ‘लव जिहाद’ पैशाच्या भरोसे ठेकेदारीतही आघाडीवर आहे. यासंदर्भात शहरात चर्चा सुरू आहे.
दरम्यान, या ‘लव जिहादी’ हुस्नोद्दीनने काही ठिकाणी कामे अर्धवट सोडून पैसे काढून घेतल्यामुळे जळगाव येथील एका न्याय मंचमध्येही त्याच्याविरुद्ध खटला सुरू असल्याचे एका आले. दिवसापासून एक ‘लव जिहादी’ विश्वसनीय सूत्राकडून सांगण्यात भुसावळ येथे गेल्या काही नामक ठेकेदार ‘पेंटर’ याच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. या ठेकेदाराने स्वतःसाठी व समाजामध्ये अनेक तरुणींना फसवून त्या मुलींची लग्न समाजातील व्यक्तींशी लावून दिल्याची सूत्रांकडून माहिती दिली आहे.
या तरुणांचे लग्न लावून दिल्यानंतर त्यांना पुणे, मुंबई यासह इतर मोठ्या शहरांमध्ये काही दिवस कामाधंद्याला लावत असल्याची चर्चा शहरात आहे. सर्रास ‘लव्ह जिहाद’ म्हणून प्रसिद्ध असलेला हा व्यक्ती सध्या पैशांच्या भरोशावर ठेकेदारीतही आघाडीवर आला आहे.
आगामी अधिवेशनात कोणते मंत्री प्रश्न मांडणार अन् विधानसभेत काय चर्चा होणार; जिल्ह्याचे लक्ष
दरम्यान, या ‘लव जिहाद’ प्रकरणासंदर्भात येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न गाजणार असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे विधानसभेत प्रश्न जाण्यापूर्वीच शहर व बाजारपेठ पोलिसांकडून काही चौकशी होऊन कारवाई करण्यात येणार का? याकडे भुसावळ शहर व तालुक्यात एकच चर्चा आहे. विधानसभेत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे हा प्रश्न उपस्थित करणार असल्याचे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे, तर जिल्ह्यातील दुसरे ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन हेही हा प्रश्न विधानसभेत मांडणार असल्याचे त्यांनी दिवाळीच्या दिवशी रावेर तालुक्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. दरम्यान, हा प्रश्न भुसावळचाच असल्यामुळे भुसावळ येथील आमदार तथा राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईलवर प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही. मात्र प्रश्न भुसावळचाच असल्यामुळे तेही या प्रश्नासाठी विधानसभेत आवाज उचलणार असल्याचा जाणकारांचा अंदाज आहे.
दीपनगर येथील काही कामे केली अर्धवट, पैसे काढले मात्र पूर्ण
त्याने दीपनगर येथेही काही ठेके दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने घेऊन कामे सुरू केली आहेत. मात्र दीपनगर येथील काही कामे अर्धवट सोडून पैसे पूर्ण काढले असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले. मात्र या हुस्नोद्दीनला शहरातून कुणाचा आशीर्वाद आहे यासंदर्भात मात्र कुणीही बोलण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे.









