पुणे : पुण्याच्या कोथरूडमध्ये दाताच्या डॉक्टर असणारी महिला अनिष्ट दाखवत ख्रिस्ती धर्माचा प्रचार करत असल्याची घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. नाताळ निमित्त दुकानापुढे मोठा मांडव टाकत जेष्ठ नागरिकांसह ६ ते १६ वय गटातील मुलांमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रचार सुरू होता. हा प्रकार येथील संघ स्वयंसेवकांसह भाजप कार्यकर्त्यांना लक्षात येताच त्यांनी तो कार्यक्रम बंद पाडला. याबाबतची सविस्तर माहिती भाजपच्या वरिष्ठ पदाधिकारी उल्काताई मोकसदार यांनी जळगाव तरुण भारतला दिली.
डहाणूकर कॉलनीतील एका चौकात दाताच्या डॉक्टर असणार्या महिला आपल्या व्यवसायाचा उपयोग करून जेष्ठ नागरिकांसह ६ ते १६ वय गटातील मुलांमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रचार करत आहे, असं, अलकाताई मोकसदार यांच्या कानावर आलं. तसेच काही क्षणातच डहाणूकरच्या ग्रुपवर याबाबत एकाने पोस्ट टाकली. आम्ही सायंकाळी ठीक सहा वाजता हा कार्यक्रम बंद पाडणार आहोत. असं या पोस्टमध्ये होते. हे वाचून उल्काताई मोकसदार यांना जाणीव झाली की धर्म प्रचार करणारी महिला आहे आणि तरूण संघ स्वयंसेवक तिथे जाणार आहेत.
उल्काताईं सांगतात, डॉक्टर बाईला पुढे करून हे सगळं धर्म कारण सुरु झालेलं होतं. कारण ती कुठल्याही पातळीवर जाऊ शकली असती. कार्यक्रम बंद करणाऱ्या स्वयंसेवकांवर तिने स्त्रीत्वाचा गैर फायदा घेऊन कुठलाही आरोप केला असता. तिने कदाचित कार्यकर्त्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असता. त्यामुळं त्या ठिकाणी स्वयंसेवकांच्या मदतीला खंबीर महिलांची उपस्थिती मला आवश्यक वाटली.
अलकाताई मोकसदार व इतर काहींनी या दोनच मिनिटात ते ठिकाण गाठलं. कार्यकर्त्यांनी डॉक्टर महिलेला हातातील माईक बंद करायला लावला. त्याचवेळी पोलीस देखील दाखल झाले. मात्र, डॅाक्टर बाई उल्काताई आणि कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करू लागली. यावर फुस लावून धर्मांतर करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे असा ईशारा देताच डॅाक्टर वरमल्या आणि कार्यक्रम बंद पडला. दरम्यान, दोन दिनापासून सदर महिलेचे क्लिनीक बंद असल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली. मात्र, सात-आठ वर्षांपासून या दाताच्या क्लिनीकमधून येशूची प्रचारपत्रके पेशंटला वाटली जात असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.