---Advertisement---

पाचोरा पिपल्स को ऑप. बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनल विजयी

---Advertisement---

पाचोरा : दि पाचोरा पिपल्स को ऑप. बँकेच्या निवडणुकीत आ.किशोर पाटील यांच्या सहकार पॅनलने निर्विवाद बहुमत प्राप्त केले आहे. अतुल संघवीसह 9 उमेदवार निवडून आले आहे. अपक्ष उमेदवार निलेश मराठे यांनी (1547) मते मिळवीत कडवी झुंझ देत पराजित झाले आहेत.

कै. आर. ओ. तात्या पाटील व्यापारी भवन येथे निवडणूक प्रकिया सोमवारी (14 जुलै ) रोजी पार पडली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आर. आर. पाटील यांनी निकाल घोषित केल्यानंतर सहकार पॅनलच्या विजयी उमेदवारांतर्फे व्यापारी भवन येथून ढोलताशांच्या गजरात गुलालाची उधळण करीत भुयारी मार्ग ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मळ्यापर्ण करण्यात आली.

---Advertisement---

अंतिम मतमोजणी निकाल असा, सर्वसाधारण मतदारसंघ एकूण मतपत्रिका : 4518, एकूण वैध मते : 35015, एकूण वैध मतपत्रिका : 4383, एकूण अवैध मतपत्रिका : 135

सर्वसाधारण मतदारसंघात 9 उमेदवार हे निवडून आले आहेत. निवडून आलेले उमेदवार व कंसात त्यांना मिळालेली मते खालीलप्रमाणे
अनंत बाबुराव पाटील (3874), नरेंद्र उत्तमराव पाटील (3794), स्वप्नील सुधाकर पाटील (3779), देवेंद्र रमणलाल कोटेचा
(3770), अविनाश वसंतराव कुडे (3747), अतुल सुभाषचंद संघवी (3647), प्रशांत श्रीकिसन अग्रवाल (3641),
पुखराज इंदरचंद डांगी (361), राहुल अशोक संघवी (3605).

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---