corona : राज्यातील कोरोनाचा धोका सातत्याने वाढताना दिसत असून आज एकाच दिवसात रुग्णसंख्येने हजारांचा टप्पा गाठला आहे. आज राज्यात कोरोनाच्या 1,115 रुग्णांची नोंद झाली असून कोरोनामुळे तब्बल नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
दरम्यान, मंगळवारी राज्यात 919 रुग्णांची नोंद झाली होती तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्या तुलनेने आज दोन्ही संख्येत मोठी भर पडली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण होत आहे.
राज्यात आज कोरोनामुळे नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला असून गेल्या काही महिन्यांतील ही सर्वात मोठी आकडेवारी आहे. राज्यात आज एकूण 560 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येमध्येही वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. राज्यात आज कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येने पाच हजारांचा टप्पा गाठला असून ती संख्या 5,421 इतकी झाली आहे.
राज्यात आतापर्यंत 79,98,400 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 98.11 टक्के इतकं झालं आहे. तर राज्यात आत कोरोनामुळे नऊ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यातील मृत्यूदर हा 1.82 टक्के इतका झाला आहे. राज्यात आतापर्यंत 9.40 टक्के चाचण्या या पॉझिटिव्ह आल्या आहेत.