तरुण भारत लाईव्ह न्यूज । नव वर्षाच्या स्वागतापूर्वी चालू वर्षाला निरोप देण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. नववर्षाच्या स्वागताचे सर्वांना वेध लागले आहे. मात्र पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. भारतातही सर्व राज्यांना कोरोना अॅडव्हायजरी जारी केली आहे.चीन, ब्राझीलमध्ये पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा वेग वाढला आहे. त्यामुळे देशात कोरोनासंदर्भात नव्या गाईडलाईन्स किंवा खबरदारीचे उपाय जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाचं उगम स्थान मानलं जाणाऱ्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढला आहे.
मात्र या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले की, पुण्यात ३१ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत रेस्टोबार सुरू राहणार आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात रेस्ट्रोबार पहाटे पाच वाजेपर्यंत तर वाईन, बिअर आणि देशी मद्य विक्री दुकाने रात्री साडेदहा ऐवजी रात्री एक वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले की, आपल्याला धोका पत्कारायचा नाही, त्यामुळे खबरदारी घेतली जात आहे. तुम्हीही कोरोना नियमांचं पालन करत वर्षाअखेर आणि नवीन वर्षाचं धुमधडाक्यात साजरा करा. तसेच पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट्सवर कोणतेही नवीन निर्बंध जारी केलेले नाहीत. उत्सवाबाबत आम्ही हॉटेल मालकांच्या बैठका घेतल्या आहेत आणि त्यांना आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले आहे. सार्वजनिक ठिकाणी, आम्ही पोलीस बंदोबस्त ठेवणार आहोत.