Corona : गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज पुन्हा वाढ झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 4587 इतकी झाली आहे. आज राज्यात 560 जणांनी कोरोनावर मात केली आहे, त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 79,96,883 इतकी झाली आहे. राज्यात मुंबई आणि पुण्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्यत वाढ होत आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज 788 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईतील सक्रीय रुग्णांची संख्या एक हजार 434 इतरी आहे. त्यानंतर ठाण्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 820 इतकी आहे. तर रायगडमध्ये 251 सक्रीय रुग्ण आहेत. पुण्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 747 इतकी आहे. परभणीमध्ये एकही सक्रीय रुग्ण नाही, राज्यातील तो एकमेव जिल्हा आहे.
आज कुठे सर्वाधिक रुग्ण ?
राज्यात आज 788 नव्या रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राज्यात आज मुंबईमध्ये 221 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर पुणे महानगरपालिकामध्ये 68 नवे रुग्ण आढळले आहेत. चिंचवडमध्ये 29 रुग्णांची नोंद झाली आहे. ठाण्यात आज 38 रुग्ण आढळले आहेत. उस्मनाबादमध्ये 35 नवे रुग्ण आढळले आहेत. नागपूर महानगरपालिकामध्ये 59 नवे रुग्ण आढळले आहेत.
वाशिम, बुलढाणा, लातूर, परभणी, हिंगोली, जालना, नंदुरबार, धुळे, अहमदनगर, मालेगाव, उल्लासनगर या ठिकाणी आज एकही कोरोना रुग्णाची नोंद झाली नाही.