नवी दिल्ली : कोरोनाच्या नवीन लाटेचा सामना करण्यासाठी वैद्यकीय ऑक्सिजनचा नियमित पुरवठा त्वरित सुनिश्चित करा, शासकीय तसेच खासगी रूग्णालयांतील ऑक्सिजन संयंत्रे पूर्णपणे कार्यरत ठेवावीत आणि त्यांच्या तपासण्यासाठी नियमित ‘मॉक ड्रील’ आयोजित करण्यात यावे, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना आज एका पत्राद्वारे केली आहे.
पत्रात काय म्हटलंय?
तुमच्याकडील मेडिकल ऑक्सिजन निर्मिती करणारे PSA प्लॅंट्स पूर्ण क्षमतेनं सुरु करण्याचे तसेच त्याची नियमित तपासणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची उपलब्धता तसेच ते पुन्हा विनाव्यत्यय रिफील करण्याची व्यवस्थाही तयार असल्याची खात्री करुन घ्यावी, असे निर्देशही आरोग्य मंत्रालयानं राज्यांना दिले आहेत.
दरम्यान, देशात सध्या कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. कोविडच्या रुग्ण संख्येत वाढ होत असतील तरी तीचं प्रमाणं खूप नाहीए. पण भविष्यातील धोका टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून केंद्रानं राज्यांना तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत.