कफ सिरप प्रकरण पोहोचले सुप्रीम कोर्टात, सीबीआय चौकशीसह साठा जप्त करण्याची मागणी

---Advertisement---

 

मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे अनेक निष्पाप मुलांना आपले प्राण गमवावे लागले. हे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि संपूर्ण घटनेची सत्यता समोर यावी, यासाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली, ज्यात सीबीआय चौकशीसह साठा जप्त करण्याची मागणी करण्यात आली.

मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे आतापर्यंत एकूण १८ मुलांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तपासणीमध्ये या सिरपमध्ये ४८.६ टक्के डायथिलीन ग्लायकोल हे विषारी रसायन आढळले आहे, ज्यामुळे किडनी निकामी होण्याची दाट शक्यता असते. संभाव्य धोका लक्षात घेऊन वकील विशाल तिवारी यांनी याप्रकरणी यायालयात जनहित याचिका दाखल केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली राष्ट्रीय न्यायिक तज्ज्ञ समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी व्हावी. या घटनेशी संबंधित सर्व एफआयआर तातडीने सीबीआयकडे सोपवण्यात यावेत, बंदी घालण्यात आलेल्या कोल्ड्फि कफ सिरपचा सध्याचा संपूर्ण साठा तातडीने जप्त कराण्यात यावा. कफ सिरपचे उत्पादन, नियमन, चाचणी आणि वितरण या संपूर्ण प्रक्रियेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली.

जोखीम-आधारित केंद्र सरकारने देशातील सहा राज्यांमधील १९ औषध उत्पादन युनिट्सची तपासणी सुरू केली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने मध्यप्रदेश, राजस्थान आणि उत्तरप्रदेश सरकारांना नोटिसा बजावून या बनावट औषधांच्या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचा आणि त्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---