Jalgaon crime News: घरगुती गॅसच्या अवैध धंद्यावर छापा ; ७३ सिलिंडरसह ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव : येथील एलसीबीच्या पथकाने जळगाव शहरात अवैध धंद्यावर कारवाई केली. मलिक नगर शिरसोली येथे अवैधरित्या गॅस रिफलींग करणाऱ्यावर छापा टाकून गॅस भरण्याची मशीन, रिक्षा, भारत, एचपी व इंडियन कंपनीचे असे ७३ नग घरगुती गॅसचे सिलेंडर असा सुमारे ५ लाख २९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सूत्रांच्या माहितीनुसार, मलीकनगर शिरसोली येथील सादीक सिराज पिंजारी (वय ४१) हा राहत्या घराच्या कपाऊंडमध्ये मोकळ्या जागेत त्याच्या अॅपेरिक्षामध्ये गॅस सिलिंडरचा साठा करत होता. त्यानंतर अन्य वाहनामध्ये हा घरगुती गॅस मशीनचया सहाय्याने भरत होता. मानवी जीवन धोक्यात येईल, किंवा नुकसान होईल, ही संभवना व्यक्त केली जात होती. या अवैध धंद्याची गोपनीय माहिती एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार पथकाने त्याच्या घराकडे मोर्चा वळविला.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनात पोनि बबन आव्हाड, पोनि दत्तात्रय निकम पथकातील पोउपनि दत्तात्रय पोटे, सफौ अतुल वंजारी, अधिकार पाटील, पोहेकॉ विजय पाटील, हरीलाल पाटील, पोकों प्रदीप चवरे, ईश्वर पाटील, प्रदीप सपकाळे, शुध्दोधन ढवळे यांनी ही कारवाई केली. तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहेत. यासाठी श्रीकृष्ण बारी यांचे सहकार्य केले.