Credit Card Tips: सणासुदीला क्रेडिट कार्डने खरेदी करताय? मग, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल नुकसान!

Credit Card Tips: नवरात्रोत्सव आणि विजया दशमी अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपली आहे. नवरात्रोत्सवासून ते दिववाळीपर्यंत उत्सवाची लगबग असते. दरम्यान, प्रत्येक जण काही न काही खरेदीही करत असतो. कारण खरेदी हा प्रत्येकाचा आवडीचा विषय आहे. खरेदी आवडत नाही असा व्यक्ती शोधने जवळपास कठीण आहे. अशात सध्या ऑनलाइन शॉपिंग असो की ऑफलाइन शॉपिंग पेमेंट करण्यासाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा प्रामुख्याने वापर केला जातो. असे करणे सोईचे असले तरी बऱ्याचदा ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार समोर येतात. अशात तुम्हीही क्रेडिट कार्डने खरेदी करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या लेखात आपण क्रेडिट कार्ड वापरताना कोणत्या 5 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे जाणून घेऊया.

व्यवहाराची मर्यादा
प्रत्येक क्रेडिट कार्डवर व्यवहाराची मर्यादा निश्चित करता येते. त्यानुसार, तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्या गरजेनुसार पॉइंट ऑफ सेल (POS) वर व्यवहारची मर्यादा सेट करा. उदा. जर तुम्ही सामान्यतः 5,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांसाठी कार्ड वापरत नसाल, तर तुम्ही त्यानुसारच व्यवहार मर्यादा सेट करा. असे केल्याने, तुम्ही एका वेळी तुमच्या क्रेडिट कार्डद्वारे या मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार करू शकणार नाही.

कॉन्टॅक्टलेस व्यवहार
डिजिटलायझेशनच्या या युगात, बहुतेक क्रेडिट कार्ड कॉन्टॅक्टलेस व्यवहारांची सुविधा देतात. पण असे व्यवहार खूप जोखमीचे ठरु शकतात. वास्तविक, कॉन्टॅक्टलेस व्यवहारात पिन न टाकता पेमेंट करता येते. अशा परिस्थितीत तुमचे कार्ड चुकून हरवले किंवा चुकीच्या हातात पडले तर मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे कॉन्टॅक्टलेस व्यवहाराची सुविधा बंद करा.

गरजेनुसार कार्ड मर्यादा
तुमचा व्यवहार चांगला असेल तर क्रेडिट कार्ड कंपन्या तुम्हाला कार्ड लिमिट वाढवण्यासाठी मेसेज पाठवतात किंवा कॉल करतात. अशा वेळी गरज नसेल तर कार्ड लिमिट वाढवू नका. कार्डची लिमिट वाढल्यास सहाजिकच तुम्ही गरजे पेक्षा जास्त खर्च कराल.

पैसे काढण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरणे टाळा
क्रेडिट कार्डवर ठराविक मर्यादेपर्यंत रोख रक्कम काढता येते. पण तसे करणे टाळले पाहिजे. पैसे काढण्यासाठी क्रेडिट कार्डऐवजी डेबिट कार्डचाच वापर करावा. कारण क्रेडिट कार्डद्वारे पैसे काढल्यास त्या पैशांवर त्या दिवसापासूनच व्याज सुरुवात होते. त्यामुळे रोख रक्कम काढण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर टाळावा.

आंतरराष्ट्रीय व्यवहार थांबवा
तुम्ही परदेशात प्रवास करत नसाल तर तुमच्या कार्डमधील आंतरराष्ट्रीय व्यवहाराचं ऑप्शन बंद करा. गरज भासल्यास ते पुन्हा सुरूही करता येत. पण गरज नसेल तर बंदच ठेवा. याव्यतिरिक्त, कोणतेही आंतरराष्ट्रीय ई-कॉमर्स किंवा ऑनलाइन व्यवहार मर्यादित किंवा बंद करा. करण बहुतेक आंतरराष्ट्रीय ऑनलाइन व्यवहार सामान्यतः OTP शिवाय पूर्ण होतात. यातुन तुमची फसवणूक होऊ शकते.