प्रेमात कधी काय होईल काही सांगता येत नाही. एकाच मुलावर दोन बहिणींचं प्रेम. दोघींमध्ये अनेकदा यावरून वाद होत होते. मात्र एक दिवस दोघी म्हशी चारण्यासाठी गेल्या अन् तिथे असं काही घडलं ज्यामुळे संपूर्ण गाव हादरून गेलं आहे.
प्रेमामध्ये कोण काय करेल हे सांगणे फार कठीण आहे. अशीच एक अत्यंत धक्कादायक घटना घडलीये. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ निर्माण झाली. चुलत बहिणीनेच आपल्या बहिणी हत्या केली. समजावून सांगूनही बहिण ऐकत नसल्याने अखेर दुसऱ्या बहिणीने आपल्या रस्त्यातील काटा काढत चुलत बहिणीची हत्या केली. घडलेली संपूर्ण घटना ऐकल्यानंतर पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली. विशेष म्हणजे पोलिसांनी तीन तासांमध्ये हत्येचे रहस्य उघड केले.
राजस्थानमधील केकडी येथे हैराण करणारी घडना घडलीये. हे सर्व प्रकरण प्रेम प्रकरणातून घडल्याचे उघडकीस आले. दोन्ही चुलत बहिणी एकाच मुलाच्या प्रेमात पडल्या. आरोपी तरुणी मृत बहिणीला सतत आपल्या बॉयफ्रेंडपासून दूर राहण्यास सांगत होती. मात्र, काहीही करून बहिणी आपल्या बॉयफ्रेंडपासून दूर राहत नसल्याचे आरोपी बहिणीच्या लक्षात आले.
आरोपी बहिणीने पोलिसांना सांगितले की, मी तिला शंभर वेळा सांगितले होते की, माझ्या बॉयफ्रेंडपासून दूर राहा. पण तिला समजतच नव्हते. मी नसताना ती सतत माझ्या बॉयफ्रेंडसोबत फोनवर बोलत होती. हेच नाही तर त्याच्याशी जवळीक वाढवत होती. यावरून घरामध्येही मी तिला बोलत होती. मला तिला मारायचे नव्हते, पण मी तिला काय सांगत होते ते तिला कळतच नव्हते.
१५ ऑगस्टला आम्ही दोघी नेहमीप्रमाणे म्हशी चारण्यासाठी शेतात गेलो होतो. यावेळी आमच्या दोघींमध्ये बॉयफ्रेंडवरून वाद झाला. ती माझे अजिबातच ऐकत नव्हती. यावेळी माझा राग जास्त अनावर झाला आणी, मी काठीने तिला मागून जोरात मारले आणि लगेचच ती जमिनीवर कोसळली. नेमके काय घडले, याची संपूर्ण माहिती ही आरोपी बहिणीने दिलीये.
या प्रकारानंतर यांच्या घरच्यांचा पायाखालची जमिन सरकली आहे. हेच नाही तर पोलिसांनी अवघ्या तीन तासांमध्ये गुन्हा कबुल करून घेतला. मात्र, प्रेमासाठी दोन्ही बहिणी कोणत्या टोकाला गेल्या याची आता जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. या खळबळजनक घटनेनंतर संपूर्ण गावामध्ये एक चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे.