तळोदा : तळोदा शिवारात ३२ वर्षीय तरुणीला अज्ञाताने कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळोदा शिवारातील खांडसरी समोरील, पेट्रोल पंपच्यामागे भवर शिवारात राकेश अरुण मोरनकर यांच्या शेतातल्या झोपडीत रंजना उर्फ रंज्या बादशा पाडवी वय 32 रा. भंवर ही तरुणी 2 रोजी सकाळी 10 .30 ते दुपारी 1. 30 च्या सुमारास खाटेवर झोपली होती.
दरम्यान, अज्ञाताने तिच्या तोंडाला डाव्या बाजुस हत्याराने जबर दुखापत करुन जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला.या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
ते राकेश अरुण मोरनकर यांच्या शेताची रखवाली करत असल्याने तेथेच शेतातच झोपडी करुन राहत आहेत. घटना घडली पेट्रोल पंप आणि बायपास रोडवर जेथे नेहमी वाहनांची रहदारी असते. अशा मनुष्य वर्दीळीच्या ठिकाणी अज्ञाताने तरुणीवर प्राणघातक हल्ला करणे गंभीर कृत्य आहे.
या महिलेवर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तळोदा पोलीस ठाण्यात याप्रकरणी शनिवार दिनांक 3ऑगस्ट रोजी अज्ञात हल्लेखोरा विरुद कलम 109 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप करीत आहेत.