---Advertisement---

Jalgaon Crime News : अज्ञाताकडून रिक्षाची जाळपोळ, छत्रपती शिवाजीनगरातील संतापजनक प्रकार

---Advertisement---

जळगाव : जळगाव शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, छत्रपती शिवाजीनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात माथेफिरू व्यक्तीने घरासमोर उभी केलेली रिक्षा पेटवून दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची तक्रार जळगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

अजय राजेंद्र जगताप (वय ३४, रा. लाकूडपेठ, छत्रपती शिवाजीनगर, जळगाव) हे रिक्षाचालक म्हणून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे असलेली राजू गणपत चौरे यांच्या मालकीची ऑटो रिक्षा (क्रमांक MH 19 CW 6348) गुरुवारी (६ फेब्रुवारी) रात्री एक वाजताच्या सुमारास घरासमोर उभी होती. अचानक अज्ञात व्यक्तीने रिक्षेला आग लावली. काही वेळातच संपूर्ण रिक्षा जळून खाक झाली.

हेही वाचा : अनैतिक संबंधाचा भयंकर शेवट; प्रेयसीने बोलावलं अन्… अखेर तिघांना अटक

या घटनेत रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाल्याने जवळपास २.५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी रिक्षाचालक अजय जगताप यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, ह्या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल ओमप्रकाश सोनी करत आहेत.

गुन्हेगारी वाढतेय, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शहरात अशा प्रकारच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे छत्रपती शिवाजीनगरसह संपूर्ण जळगाव शहरात सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीचा शोध घ्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment