---Advertisement---

Crime News: चिमुकला मित्रांसोबत फटाके फोडत होता, पण घाबरून घरी आला आणि…

by team
---Advertisement---

Crime news: दिवाळीमध्ये लहान मुलांना फटाक्यांचे विशेष आकर्षण असते. अश्यातच एक घटना समोरआली आहे, फटाक्यांचे आमिष देऊन अवघ्या ८ वर्षांच्या मुलंसोबत नरधामने अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिमुकल्या सोबत असं काही केलं जे ऐकूनच तुम्ही हादराल.याप्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी गुन्हा दाखल करून 32 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपीने मुलाला जीवे मारण्याचंही धमकी दिली आहे. याप्रकरणी ॲन्टॉप हिल पोलिसांनी अनैसर्गिक अत्याचार, धमकावणे व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून 32 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या.

चिमुकला मित्रांसोबत फटाके फोडत होता, पण घाबरून घरी आला आणि…

दिवाळीच्या निमित्ताने मंगळवारी पीडित मुलगा त्याच्या मित्रांसोबत घराजवळ फटाके फोडत होता. त्याचवेळी आरोपी तिथे आला आणि त्याने त्या चिमुकल्या मुलाला आणखी फटाके देण्याचे आमिष दाखवले. फटाक्यांचे नाव ऐकून त्याचे डोळे उत्साहाने लुकलुकले. त्यानंतर आरोपीने त्याला सोबत घेतले आणि तो जवळच्याच इमारतीत घेऊन गेला. तेथए नेऊन त्याने त्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला. एवढेच नव्हे तर घडलेल्या या प्रकाराबाबत कोणालाही सांगितलं किंवा जराही तोंड उघडलंस तर ठार मारेन अशी धमकीही त्या नराधमाने चिमुकल्या मुलाला दिली.

घाबरलेल्या अवस्थेतच तो पीडित मुलगा घरी आला आणि सगळा प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर बुधवारी अँटॉप हिल पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक अत्याचार, ठार मारण्याची धमकी व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विनयभंग आणि अश्लील वर्तन केल्याबद्दल या आरोपीविरोधात अँटॉप हिल व माटुंगा पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी पीडिताचे कुटुंबिय आणि इतर नागिकांकडून करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment