Crime News : जबरी लुटीतील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

भुसावळ : जबरी लूट प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्यातील पसार संशयीताला बाजारपेठ पोलिसांनी रविवारी सायंकाळी अटक केली. शिवम जगदीश पथरे (वाल्मीक नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुरनं. 153/2024 भादंवि 392 व 341 अन्वये दाखल गुन्ह्यात आरोपी शिवम हवा होता मात्र तो पसार असल्याने त्याचा शोध सुरू असताना रविवारी तो आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली.

ही कारवाई भुसावळ पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे व बाजारपेठ पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, हवालदार विजय नेरकर, निलेश चौधरी, महेश चौधरी व कॉन्स्टेबल भूषण चौधरी आदींच्या पथकाने केली.