Crime News: सावदा शिवारातील कोचूर रोडवरील एका शेतात काम करणाऱ्या सालदाराचा शेतातील खोलीत डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना शनिवार, ३० रोजी सकाळी उघडकीस आली होती. या घटनेत सुभाराम रिच्छू बारेला याचा खून करण्यात आला होता. सावदा पोलिसांनी अवघ्या चार तासात खुनाची उकली केली असून दोन आरोपींना अटक केली आहे. सुकलाल रतन लोहारे व अर्जुन मुन्ना आवासे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
जुन्या वादातून हा खून केल्याची कबुली आरोपीनी पोलिसांना दिली आहे.चार तासात गुन्ह्याची उकल सावद्याचे सहायक निरीक्षक जालिंदर पळे व पथकाने धाव तपासाची चक्रे वेगाने फिरवून आजुबाजुच्या परिसरातील सालगडी म्हणून काम करणाऱ्या सर्व मजुरांची माहिती घेतली.
त्यावरुन दोन सालगडी त्याचे कामाच्या व राहण्याचे ठिकाणी नसल्याचे कळाले तर मालकाकडून शनिवारीच पैसे घेऊन ते गावी गेल्याचे कळल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. एका आरोपीचे नातेवाईक उदळी येथे असल्याचे कळाल्यानंतर गोपनीय माहितीवरून आरोपींना अटक करण्यात आली. यापूर्वी झालेल्या वादाच्या रागातून शनिवारी मध्यरात्री मयताच्या डोक्यात दगड टाकल्याची कबुली आरोपींनी दिली. अवघ्या चार तासात गुन्ह्याची उकल करण्यात सावदा पोलिसांना यश आले.
यांनी उघडकीस आणला गुन्हा जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जालिंदर पळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे, एएसआय संजय देवरे, हवालदार विनोद पाटील, हवालदार यशवंत टहाकळे, हवालदार देवेंद्र पाटील, हवालदार विनोद तडवी, प्रकाश जोशी, किरण पाटील आर्दीच्या पथकाने गुन्हा उघडकीस आणला