जळगाव : शहरातील एका भागात राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार करण्यात आला. हा प्रकार मार्च ते जुलै २०२४ दरम्यान घडला. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडितेच्या फिर्यादीवरून, शहरातील एका भागात राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीवर स्नेह किशोर लाठीग्रा (२०, रा. शांती नगर, जळगाव) याने अत्याचार केला. हा प्रकार मार्च ते जुलै २०२४ दरम्यान घडला. शिवाय फोनमध्ये लैंगिक कृत्याचा व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी देऊन वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
याबाबत मंगळवार, ६ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास स्नेह किशोर लाठीग्रा ( वय २०, रा. शांती नगर, जळगाव) याच्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे करीत आहेत.