---Advertisement---
हतनूर : (ता. भुसावळ) हतनूर येथे खळबळजनक घटना समोर आली आहे. हतनूर येथे शेतशिवारात ही घटना घडल्याचे समोर आले आहे, पती-पत्नीच्या किरकोळ वादातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. भुसावळ तालुक्यातील हतनूर येथील शेतशिवारात जितेंद्र गंगाराम हेमब्रम हा पत्नी शांतीदेवी जितेंद्र हेमब्रम हे दांपत्य या ठिकाणी वास्तव्यास आहे. पती व पत्नी या दोघांमध्ये रात्री वाद झाला.
व पती जितेंद्र याने दारूच्या नशेत पत्नी शांतादेवी हिला लाथाबुक्यांनी मारहाण करून तिचा गळा आवळल्याने शांतीदेवी हिचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलिसांना पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेची चौकशी करता आहे. हे दांपत्य उत्तरप्रदेश राज्यातील असल्याचे समोर आले आहे. ते एका शेतकऱ्याकडे कामाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पत्नीचा मारेकरी जितेंद्र यास पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. शांतीदेवी यांचा मृतदेह पोलिसांनी तपासणीसाठी पाठविला आहे. वरणगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार आडसूळ, उपनिरीक्षक परशुराम दळवी, किशोर पाटील तपास करीत आहेत.