Crime News: प्रेमीयुगलाची हत्या, पाच आरोपींना जन्मठेप, वकिला पाच वर्षांची शिक्षा

Crime News : चोपडा शहरातून खबळजनक घटना समोर आली आहे.प्रेम संबंधातून प्रेमीयुगलची हत्या केल्याची घटना समोर आली होती, मयत मुलीच्या भावासह पाच आरोपींना जन्मठेप, तर पुरावे नष्ट करण्याचा सल्ला देणाऱ्या वकिलासह दोघांना पाच वर्षांची शिक्षा अमळनेर न्यायालयाचे न्या. पी. आर. चौधरी यांनी सोमवारी सुनावली. या खटल्यात एकूण २१ साक्षीदार तपासण्यात आले. दुहेरी खून खटल्यात आरोपींना जन्मठेप राकेश संजय राजपूत  व वर्षा समाधान कोळी यांच्यात दोन वर्षांपासून प्रेम संबंध होते, मात्र तरुण अन्य समाजाचा असल्याने या संबंधास कुटुंबियांचा विरोध होत होता व त्यातून घरात सातत्याने वादही होते.

त्यात १२ ऑगस्ट २०२२ रोजी राकेश राजपूत हा संशयित आरोपीच्या घरी रात्री आठ वाजता आल्यानंतर आरोपींनी संतापाच्या भरात वर्षा कोळी व राकेश राजपूत दोघांनाही दुचाकीवर बसवून चोपडा शहराजवळील नाल्याजवळ नेले. तेथे राकेश राजपूत याला बंदुकीने गोळी झाडून त्याचा खून केला तर वर्षा कोळी ही प्रतिकार करीत असताना तिची गळा दाबून हत्या केली.चोपडा शहर पोलीस स्टेशनला दुहेरा खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अमळनेर न्यायालयात खटल्याचे कामकाज चालले. ‘

सरकार पक्षातर्फे अमळनेर न्यायालयात दाखल खटल्यात २१ साक्षीदार तपासण्यात आले. विशेष म्हणजे संशयित आरोर्पीनी गुन्हा केल्यानंतर अॅड. नितीन मंगल पाटील यांच्याकडे जाऊन खुनाबाबत सल्ला घेतल्यानंतर त्यांनी पुरावा नष्ट करण्याचा सल्ला दिल्याने त्यांनाही आरोपी करण्यात आले.पैरवी अधिकारी ए. एस.आय. उदयसिंग साळुंखे होते. त्यांना हवालदार हिरालाल पाटील, नितीन कापडणे, राहुल रणधीर, विशाल तायडे आदींनी सहकार्य केले.